🔥
आम्ही लऊळकर
लऊळ गावाची डिजिटल ओळख
← सर्व स्पर्धा
छायाचित्रण

आम्ही लऊळकर - वारी तुमच्या नजरेतून - छायाचित्रण स्पर्धा - २०२६

🗓 शेवट: 29 जुलै 2026 📥 0 सादरीकरणे 👥 १५ ते ४५ वर्षे
आम्ही लऊळकर - वारी तुमच्या नजरेतून - छायाचित्रण स्पर्धा - २०२६
स्पर्धेबद्दल
आम्ही लऊळकर - आषाढी वारी छायाचित्र स्पर्धा २०२६

आषाढी वारीच्या दिवसांत लऊळ आणि परिसरात अनुभवायला मिळणारे भक्तिमय वातावरण, गावातून जाणाऱ्या पालख्या-दिंड्या, वारकऱ्यांची लगबग, टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि सेवाभावाचे असंख्य क्षण...!

यंदा हे क्षण फक्त अनुभवा नका, तर आपल्या कॅमेऱ्यातही जतन करा!

आम्ही लऊळकर वेब पोर्टल आयोजित "वारी तुमच्या नजरेतून" छायाचित्र स्पर्धेत सहभागी व्हा आणि आषाढी वारीच्या काळात **लऊळ व परिसरात** टिपलेले खास क्षण आपल्या छायाचित्रातून सर्वांसमोर आणा.

पालखी-दिंडीचे आगमन, वारकऱ्यांचे स्वागत, अन्नदान व सेवा, गावकऱ्यांचा सहभाग, भक्तीचे भावस्पर्शी क्षण किंवा वारीमुळे विठ्ठलमय झालेले लऊळ — तुमच्या नजरेला भावलेला कोणताही क्षण कॅमेऱ्यात टिपा.

🏆 निवडक छायाचित्रांना लऊळ वेब पोर्टलवर विशेष स्थान देण्यात येईल आणि उत्कृष्ट छायाचित्रांचा गौरव केला जाईल.
📋 नियम व अटी
स्पर्धेचे नियम

• छायाचित्र आषाढी वारीच्या काळात "लऊळ किंवा लऊळ परिसरात" टिपलेले असावे.
• छायाचित्र स्पर्धकाने स्वतः काढलेले असावे.
• एका स्पर्धकाला जास्तीत जास्त 2 छायाचित्रे सादर करता येतील.
• छायाचित्रासोबत ठिकाण आणि त्या क्षणाचे थोडक्यात वर्णन देणे आवश्यक आहे.
• मोबाईल किंवा कॅमेऱ्याने काढलेली छायाचित्रे स्वीकारली जातील.
• AI द्वारे तयार केलेली किंवा छायाचित्राच्या मूळ स्वरूपात मोठा बदल करणारी छायाचित्रे स्वीकारली जाणार नाहीत.
• स्पर्धेसाठी सादर केलेले छायाचित्र यापूर्वी इतर कोणत्याही स्पर्धेत विजेते ठरलेले नसावे.
• छायाचित्रातील व्यक्तींचा सन्मान आणि वारीचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे.
• निवडक छायाचित्रे आम्ही लऊळकर वेब पोर्टल व त्याच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांवर छायाचित्रकाराच्या नावासह प्रसिद्ध केली जाऊ शकतात.
• विजेत्यांची निवड छायाचित्राची - कल्पकता, भाव, विषयाशी सुसंगती आणि छायाचित्रण कौशल्य - यांच्या आधारे केली जाईल.
• परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
🏆 बक्षिसे
🏆 विजेत्यास पारितोषिक

सर्वोत्कृष्ट छायाचित्रास ₹५००/- रोख पारितोषिक व लऊळ वेब पोर्टलवर विशेष प्रसिद्धी! 📸

📸 विजेत्या छायाचित्रांना आम्ही लऊळकर वेब पोर्टलवर विशेष प्रसिद्धी" देण्यात येईल. तसेच छायाचित्रकाराच्या नावासह निवडक छायाचित्रांना वारी तुमच्या नजरेतून विशेष छायाचित्र दालनात स्थान दिले जाईल.
◆ तारखा
सुरुवात 7 जुलै 2026
शेवट 29 जुलै 2026
◆ माहिती
📥 एकूण सादरीकरणे: 0
📁 प्रकार: any
🔢 कमाल: 1 सादरीकरण
🌟 स्पर्धेत सहभागी व्हा